राधा मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने डॉ.विभाश्रीजी
दिदी यांच्या उपस्थितीत रविवारी ज्ञान यज्ञ
परळी येथे दवा और दुवाओं का अनोखा संगम अशी ओळख असलेला ज्ञान यज्ञ दि.9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 ते 7 या वेळेत बाबा रामदेव मंदिर, गणेशपार रोड परळी येथे होणार आहे. प्रसिद्ध शनि साधिका तथा अध्यात्मीक चिकित्सक अशी ओळख असलेल्या डॉ.विभाश्रीजी दिदी यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत.
देशभरात शनि साधिका म्हणून परिचित असलेल्या डॉ.विभाश्रीजी दिदी यांच्या उपस्थितीत ज्ञानयज्ञ कार्यक्रमाचे आयोजन राधा मोहन साथी प्रतिष्ठान परळीच्या वतीने करण्यात आले आहे.
विविध प्रकारच्या रोगांचे कारण, निवारण, गृहशांती आदींवर ते अध्यात्मीक चिकित्सा करणार असून आरोग्य आणि आयुष्य सुखकारक होण्याच्या दृष्टीकोनातून त्या मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राधा मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत आहे.

Social Plugin