Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित....?|भाजपाची माघार |'ही' निवडणूक बिनविरोध होणार



भाजपाची माघार |'ही' निवडणूक बिनविरोध होणार |ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित....?|


मुंबई येथे शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली होती शिंदे यांच्या बंडखोरीनंतर ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली.


आता भाजपने या निवडणुकीतून माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असली तरी अखेर भाजपची माघार अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यादृष्टीने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 


आज सकाळीही भाजप नेत्यांच्या महत्त्वाच्या बैठका झाल्या.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही निवडणूक बिनविरोध व्हावी,अशी मागणी केली होती.त्यानंतर शरद पवार यांनीही असेच आवाहन केले.


ही निवडणूक बिन विरोध होणार हे अखेर स्पष्ट झाले आहे.ऋतुजा लटके काय म्हणाल्या की, निवडणूक बिनविरोध होणार हे जवळपास स्पष्ट झाल्यानंतर ऋतुजी लटके यांनी सर्व राजकीय नेत्यांचे आभार मानले आहेत.



 ही निवडणूक बिनविरोध व्हावी,ही सर्व कार्यकर्त्यांची आणि माझी इच्छा होती,असे त्या म्हणाल्या. दरम्यान राज ठाकरे,शरद पवार यांच्यासह प्रताप सरनाईक ऋतुजा लटके यांनीही निवेदनाबद्दल आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या