शिक्षणाचे धडे देताना स्वतःची ओंजळ रिकामी करणारे माजी मुख्याध्यापक यांचे निधन..
परळी येथील काही गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाचे धडे देताना स्वतःची ओंजळ रिकामी करणारे सर्वांचे आवडते व विद्यार्थी असलेले निवृत माजी मुख्याध्यापक शिवाजीराव देशमुख यांचे आज निधन झाले.
परळी येथील माधवबाग परिसरात असलेल्या वैद्यनाथ विद्यालचे निवृत्त मुख्याध्यापक शिवाजीराव विठ्ठलराव देशमुख (पोहनेरकर) (वय ७८) यांचे सोमवारी दुपारी अल्पशा आजाराने परळीतील निवासस्थानी निधन झाले.
उद्या अंत्यसंस्कार...
त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.परळीतील स्नेहनगर येथील निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघेल.त्यांच्या पश्चात पत्नी,दोनमुले,दोन मुली,सुना, नातवंडे असा परिवार आहे.
औरंगाबाद खंडपीठातील अॅड. सचिन देशमुख व वैद्यनाथ विद्यालयातील शिक्षक नेताजी देशमुख यांचे ते वडील होत.
Social Plugin