Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत आमदारकीच्या चर्चेमध्ये "या" तिसऱ्या नावाची चर्चा |हे तिसरी व्यक्तिमत्व आहे तरी कोण ?



परळीत आमदारकीच्या चर्चेमध्ये "या" तिसऱ्या नावाची चर्चा |हे तिसरी व्यक्तिमत्व आहे तरी कोण ?


परळी मतदारसंघात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.त्या अनुषंगाने परळी मतदारसंघात बदलाचे वारे वाहताना दिसत आहेत.आमदारकीच्या चर्चेमध्ये तिसऱ्याचे नाव हे तिसरी व्यक्तिमत्व आहे तरी कोण ?


परळीत एखाद्या मंत्र्याच्या दौऱ्या सारखं नियोजन,आयोजन शनिवार दि.१५ऑक्टोबर २०२२ रोजी प्रसिद्ध विधीज्ञ माधव जाधव यांचा वाढदिवस परळीत मोठ्या हिताचींतकांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे.


एखाद्या मंत्र्याच्या दौऱ्या सारखं नियोजन, आयोजन माधव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त परळीत दिसून आले. आणि अनेक चर्चेला उधाण आले...

परळी मतदारसंघाचा इतिहास जर पाहिला तर इथे मुंडे घराण्याचा खूप मोठा दबदबा आहे.परंतु  परळी मतदारसंघात लोकाभिमुख प्रकल्प किंवा बदल झालेला नाही त्यामुळे मतदारसंघातील अनेक मतदार तिसऱ्या पर्यायाच्या शोधात असल्याची चर्चा होती.अनेक वर्षे एकाच घराण्याचे प्रस्थची चर्चा , इथे बऱ्याच गोष्टी वंचित आहेत या निमित्ताने असे स्पष्ट प्रतिक्रिया लोकांनी यावेळी दिल्या आहेत.


मतदारसंघाला विकसित करायचे असेल तर घराणेशाही संपून सर्वसामान्य लोकांचे नेतृत्व करणाऱ्या माणसाला कौलं द्यावा लागेल आणि सुजान मतदार कौलं देतील अशी प्रतिक्रिया माधव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमात या प्रतिक्रिया उमटताना दिसल्या..


 याकार्यक्रमाला सर्वपक्षीय सामाजिक,राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसोबत वैद्यकीय,शिक्षण, व्यापारी, शेतकरी कष्टकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित असल्याचे दिसून आले.या कार्यक्रमाचे आयोजन माधव(आप्पा)जाधव मित्रपरिवार यांनी केले होते. 


या कार्यक्रमास राष्ट्रीय काँग्रेस, संभाजी ब्रिगेड,भारतीय जनता पार्टी,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना,एम आय एम,वंचित बहुजन आघाडी,महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांसह सर्व राजकीय पक्ष संघटना यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या