Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले; जिल्हाधिकाऱ्यांचे कारवाईचे आदेश

 आपला ई पेपर/बीड 


जिल्ह्यात बोगस डॉक्टरांच्या वाढत्या सुळसुळाटावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात एक महत्त्वाची आढावा बैठक संपन्न झाली. नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या बेकायदेशीर वैद्यकीय व्यावसायिकांविरुद्ध कठोर पावले उचलण्यासाठी प्रशासनाने आता कंबर कसली आहे. 

या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य आणि पोलीस विभागाला संयुक्त पथके तयार करून तालुका स्तरावर तातडीने विशेष तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. अधिकृत परवाना नसताना वैद्यकीय सेवा देणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या असून खासगी दवाखाने, क्लिनिक आणि औषध विक्रेत्यांच्या कागदपत्रांची कसून तपासणी केली जाणार आहे. या बैठकीस अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त महादेव निमसे, आय.एम.ए. अध्यक्ष डॉ. अनंत मुळे, पोलीस उपअधीक्षक उमाशंकर कस्तुरे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सुरक्षित आरोग्य सेवेसाठी प्रशासनाने जनजागृतीवर भर दिला असून नागरिकांनी संशयास्पद डॉक्टरांची माहिती प्रशासनाला देऊन सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.