अंबाजोगाईतील दम्याच्या रुग्णांसाठी वैद्य चंदुलाल कलंत्री यांची मोफत आयुर्वेद औषधी
कोजागिरी पोर्णिमेच्या निमित्ताने दम्याच्या आजाराने त्रस्त झालेल्या रूग्णांसाठी प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वैद्य चंदुलाल कलंत्री रा. तेलगाव जि.बीड यांचे औषध अंबाजोगाई शहर व परिसरातील नागरीकांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी दि.८ ऑक्टोबर पर्यंत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.
१९४० पासून चालू असलेल्या परंपरेनुसार तेलगाव येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वैद्य चंदुलालजी कलंत्री यांच्या वतीने कोजागिरी पोर्णिमेनिमित्त दम्याच्या रुग्णांसाठी अंबाजोगाई येथील अंकित झंवर यांच्याकडे मोफत आयुर्वेद औषधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत औषधी वितरीत करण्यात येणार आहे. दम्याच्या रुग्णांनी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दिवसभर उपवास करावा आणि रात्री १२ वाजता कोजागिरीच्या दुधात औषधी टाकून सेवन करावे असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात येत आहे.
अंबाजोगाई साठी संपर्क व औषधी मिळण्याचे ठिकाण : योगेश्वरी नगरी जवळ, अंबाजोगाई.
अंकीत झंवर
9422242471 / 9325368351
श्रीनिवास झंवर
9422242451 / 9689722222

Social Plugin