Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत माता वैष्णोदेवी दर्शन देखाव्यास अभुतपुर्व दररोज होणारी गर्दी ही कौतुकाची थापच आहे | चंदुलाल बियाणी

 





परळीत माता वैष्णोदेवी दर्शन देखाव्यास अभुतपुर्व दररोज होणारी गर्दी ही कौतुकाची थापच आहे | चंदुलाल बियाणी


माता वैष्णोदेवी दर्शन देखाव्यास अभुतपुर्व प्रतिसाद9 तारखेपर्यंत देखावा उपलब्ध, सकाळ-संध्याकाळ लागतात रांगा

परळी/ प्रशांत प्र.जोशी-

आकर्षक अंजठा-एलोराचे प्रवेशद्वार, त्यावरुन कोसळणारे धबधबे, गुफेतून तर कधी लाकडी पुलावरुन होणारा प्रवास, बाणगंगेचे थंड असलेले पाणी आणि त्यातूनच माँ वैष्णोदेवीचे होणारे दर्शन... हे काही वर्णन नाही तर हा अनुभवातून व्यक्त झालेला देवीदर्शनाचा सोहळा आहे. माँ वैष्णोदेवीचे दर्शन घ्यावे, थेट वैष्णोदेवी येथून आलेली अखंड दिव्यज्योत डोळ्यात साठवावी आणि भैरवनाथाचे दर्शन घेऊन यात्रा पुर्ण करावी असेच काहीसे स्वरुप नाथ प्रतिष्ठान, राधा-मोहन साथी प्रतिष्ठान आयोजित दुर्गोत्सवानिमित्तच्या माँ वैष्णोदेवी दर्शन देखाव्याचे आहे. दररोजच गर्दीचा आकडा वाढत असून दोन्ही प्रवेशद्वारावर देखावा पाहण्यासाठी रांगा लागत आहेत. नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली, न.प. गटनेते वाल्मिक कराड यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी सजावटकार राकेश चांडक यांच्या माध्यमातून हा देखावा साकारला आहे. 




 

परळी शहरात औद्योगीक वसाहतीच्या सभागृह परिसरात नाथ प्रतिष्ठान, राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने भव्यदिव्य असा माँ वैष्णोदेवी देखावा सादर करण्यात आला आहे. अगदी जम्मू-कश्मिरमधील वैष्णोदेवी मंदीर परिसराचा हा देखावा असून सुमारे 1 किमी अंतर मार्गक्रमण करीत सर्वांना देवीचे दर्शन घ्यावे लागते. दर्शनाच्या रांगेत काही वेळ भुयारी मार्ग असून सोबतच हलणारा पुल, अधुन-मधून डोंगरदऱ्यावरुन कोसळणारे धबधबे, सततच होणारा जय माता दी...चा गजर यामुळे आपण वैष्णोदेवी मंदीर परिसरात आहोत असाचा भास होतो.

नवरात्रीच्या पहिल्या माळेपासून म्हणजेच 25 सप्टेंबरपासून हा देखावा भाविकांसाठी रु. 50 आणि 20 या प्रवेश शुल्काने उपलब्ध करुन देण्यात आला आहे. अगदी पहिल्या दिवसांपासून भाविकांची गर्दी वाढत आहे. रविवार दि. 2 ऑक्टोबर रोजी सुमारे 20 हजार भाविकांनी दिवसभरात हा देखावा पाहिला आहे. देखावा पाहण्यासाठी सहकुटूंब सहपरिवार गर्दी होत असून संपुर्ण दर्शन मार्गावर नागरिक विशेषतः मुले छायाचित्र काढण्यावर भर देतांना दिसून येतात. 


दर्शन रांगेत लागल्यानंतर प्रत्यक्ष वैष्णोदेवी मुर्तीसमोर जाण्यासाठी अर्ध्या तासाचा वेळ लागतो. दररोज वाढणारी गर्दी लक्षात घेऊन आजपासून हा देखावा संपुर्ण दिवसभर पाहण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच विजयादशमीनंतर पुढील 4 दिवस म्हणजेच 9 ऑक्टोबर पर्यंत देखाव्याची मुदत लोकाग्रहास्तव वाढविण्यात आली आहे.   दरम्यान, देखाव्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन मुदत वाढविणयासोबतच देखावा दिवसभर चालू असणार आहे. शालेय विद्यार्थ्यांची सध्या गर्दी होत असून अनेक महिला संघटना, तसेच नागरिक व संस्थांनी देखावा पाहण्यासाठी वेळ उपलब्ध करुन घेतला आहे. 


कुटूंबीय सेवेत 

माँ वैष्णोदेवी येथून अखंड दिव्यज्योत आणण्यापासून दररोज होणारी पुजा, आरती आणि येणाऱ्या-जाणाऱ्यांचे स्वागत करण्यासाठी संपुर्ण बियाणी कुटूंबीय कार्यरत आहे. माजी नगराध्यक्षा राधाबाई बियाणी यांच्या नेतृत्वाखाली सौ. कल्पना बियाणी, सौ. भारती बियाणी, सौ. सुनिता बियाणी पुर्ण वेळ सेवेत  कार्यरत आहेत. मुख्य मार्गदर्शक चंदुलाल बियाणी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार हा उत्सव यशस्वी व्हावा यासाठी संपादक सतिश बियाणी, औरंगाबाद आवृत्तीचे संपादक जगदीश बियाणी, जयप्रकाश बियाणी, सुरज बियाणी आदींसह परिवारातील अन्य सदस्य कार्यरत आहेत. 


विजयादशमीनंतर आणखी 4 दिवस देखावा

परळी शहरात नाविण्यपुर्ण उपक्रम राबविण्याबाबत आम्ही विचारात असतांनाच माँ वैष्णोदेवीचा देखावा साकारण्याची संकल्पना समोर आली. हे काम धाडसाचे होते परंतु राकेश चांडक यांच्या माध्यमातून या संकल्पनेला मुर्त स्वरुप मिळाले. काही तरी वेगळे देण्याचा प्रयत्न यातून यशस्वी झाला असून दररोज होणारी गर्दी हे आमच्यासाठी सामान्य नागरिकांनी दिलेली कौतुकाची थापच आहे. आम्ही यापुढेही नाविण्यपुर्ण असेच काही देणार आहोत. दसरा झाल्यानंतरही कोजागिरी पोर्णिमेपर्यंत हा देखावा पाहण्यासाठी उपलब्ध राहील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या