Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत पोलीस प्रशासन बेपत्ता ? वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा..|अवैध वाहतुकीचा अड्डा..ने




मुलाच्या शिक्षणात मोठा अडथळा...

या बेशिस्त वाहतुकीमुळे भेल सेकंडरी स्कूल न्यू हायस्कूल तसेच विद्यावर्धिनी शाळेतील विद्यार्थ्यांना नेहमीच त्रास होत आहे. कधीकधी परीक्षा आणि शाळेच्या वेळेत न पोचल्यामुळे सुद्धा अनेक विद्यार्थी व पालकांना या संदर्भात राग व्यक्त केला आहे वेळ होती शाळा सुटण्याची विद्यार्थी घरी जाण्याची आणि अशा वेळेस ही ट्राफिक जाम झाली एक वाजता शाळेतून बाहेर पडलेली मुले ट्राफिक मुळे घरी दीड ते दोन तास उशिरा पोहोचले पोलीस प्रशासनाने ट्राफिक पोलीसची नियुक्ती ब्रिजवर करायला हवी अशी मागणी ट्राफिक मध्ये अडकलेल्या लोकांनी केली आहे. 

एका पालकाची संतप्त प्रतिक्रिया ...



परळीत वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा..|
पोलीस प्रशासन बेपत्ता |अवैध वाहतुकीचा अड्डा..ने नागरिक त्रस्त

डॉ.शामाप्रसाद मुखर्जी रेल्वेउड्डाणपुलावर सततची वाहतुक कोंडी हा नित्याचाच बनलेला विषय आहे. 

 परळीत आज दुपारी पुन्हा एकदा उडाण पुलावर वाहतुकीचा खेळ खोळंबा झाला अवजड वाहनाच्या ट्राफिक मुळे येथे सतत टॉपिक जाम होते आहे  आज दुपारी उड्डाणपुलावर तब्बल एक ते दीड तास वाहतूक जागेवरच ठप्प झाली होती.तरीही सतत याकडे पोलीस मात्र बिनदेखतपणे दुर्लक्ष का करत आहेत हेच कळत नाही.


परळीतील उड्डाणपूल आतापर्यंत अवैध धंद्याचा अड्डा तसेच अवैध वाहतुकीसाठी व अपघातासाठी नेहमीच चर्चेत असतो. या सगळ्या घटनाचे मूळ कारण पोलिसांचे याकडे असलेला दुर्लक्ष हेच मुख्य कारण आहे.


कधीकधी याच उड्डाणपूलावर वाहनाचा दंडात्मक कारवाई च्या नावाखाली टोळक्या टोळक्याने दिसणारे तत्पर पोलीस बांधव पण आज कुठं दिसत नव्हते. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास फारच अडथळे निर्माण झाले होते. दसऱ्याच्या खरेदीसाठी  सहपरिवार निघालेल्या प्रवासी व नागरिकांना याचा मात्र सतत त्रास होत आहे. परळीकरांना उड्डाणपुलाच्या या त्रासातून कोण मुक्त करणार याकडे मात्र अनेक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या