Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

बीड एक्सीडेंट | भरधाव कारने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका मुलास उडवले


 भरधाव कारने रस्त्याच्या कडेला
थांबलेल्या एका मुलास उडवले

बीड पैठण-बारामती रस्त्यावरील कडा येथे रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास भरधाव कारने एका ५ वर्षीय मुलाला उडवले रुद्र संतोष मोटे असे मृत मुलाचे नाव आहे. 

आष्टी तालुक्यातील कडा येथील संतोष मोटे हे रविवारी रात्री पत्नी व दोन मुलांसह घरी जात होते. काही कामानिमित्त ते रस्त्याच्या कडेला थांबले होते.


यावेळी धामणगावकडून अचानक भरधाव वेगाने येणाऱ्या कारने एमएच 24, ए.डब्ल्यू. 6599 रस्त्याच्या कडेला खेळत असलेल्या रुद्रला जोराची धडक दिली. यामध्ये रुद्र गंभीर जखमी झाला. अहमदनगर येथे उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलीस हवालदार बाबासाहेब गर्जे, प्रवर्तक सचिन गायकवाड, मंगेश मिसाळ, दीपक भोजे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या