Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीतून 'या' दसरा मेळाव्याला तालुक्यातून हजारो कार्यकर्ते रवाना होणार..

 


पंकजाताई मुंडेंच्या दसरा
मेळाव्यासाठी परळीत कार्यकर्त्यांची बैठक

परळी येथे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या सावरगांव ता. पाटोदा येथे होत असलेल्या दसरा मेळाव्यासाठी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची एक बैठक आज मोठया उत्साहात पार पडली. मेळाव्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे.


    दरवर्षीप्रमाणे यंदाही पंकजाताई मुंडे यांचा दसरा मेळावा राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे जन्मस्थळ असलेल्या पाटोदा तालुक्यातील मौजे सावरगांव घाट येथे होत आहे. येत्या ५ तारखेला होणाऱ्या या मेळाव्यास महाराष्ट्रातून तसेच विविध राज्यांतून भगवानबाबांचे भक्तगण लाखोंच्या संख्येने येत असतात. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांची ही परंपरा पंकजाताई पुढे नेत असल्याने सर्वांनी या मेळाव्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन या बैठकीत करण्यात आले. 


   बैठकीस भाजपचे तालुकाध्यक्ष 

सतीश मुंडे, शिवाजीराव गुट्टे, रमेश कराड, उत्तमराव माने, श्रीराम मुंडे, राजेश गीते, व्यंकटराव कराड, वृक्षराज निर्मळ, रवी कांदे, बिभिषण फड, बाबासाहेब काळे, नितीन ढाकणे, संजय मुंडे, कांतराव सोनवणे, चंद्रकांत देवकते, बळीराम गडदे, विक्रम मिसाळ, लक्ष्मीकांत कराड, रमेश मुंडे, भरत सोनवणे, वसंत निर्मळ, हनुमंत नागरगोजे, सूर्यकांत मुंडे, मुन्ना काळे, बाळासाहेब पांडे, रावसाहेब देशमुख, शिवराज मुंडे, सुंदर मुंडे, अनिल गुट्टे, नवनाथ मुंडे, ज्ञानेश्वर मुंडे आदींसह भारतीय जनता पार्टीचे शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख, सरपंच, चेअरमन व  कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक तालुका सरचिटणीस रवी कांदे यांनी केले तर मार्गदर्शन तालुकाध्यक्ष सतीश मुंडे व भाजपाचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव गुट्टे यांनी केले. आभार भाजपाचे परळी तालुका कोषाध्यक्ष नितीन ढाकणे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या