Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

भगव्या ध्वजाची अत्यंत दुरावस्था याकडे ना..नगर पालिकेचे ना..कुठल्या नेत्याचे लक्ष ..

 



भगवे निशाणाची
अत्यंत दुरावस्था झाली असून याकडे ना..नगर पालिकेचे ना..कुठल्या नेत्याचे लक्ष !

हा घ्या सबळ पुरावा आज आत्ता काढलेला फोटो...😡

परळी येथील छत्रपती शिवाजी चौक येथे असलेले भगवे निशान अर्थात शिवाजी राजांचा भगवा झेंडा यांची अत्यंत दुरावस्था झाली असून याकडे ना नगरपालिकेचे ना कुठल्या नेत्याचे लक्ष आहे.

दिवाळी पाडव्याला प्रत्येक घरावर भगवे निशान फडकत असते परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ असलेला भगवा ध्वज अत्यंत दुरावस्था झाली असून याकडे बघून परळीतील नागरिक संताप व्यक्त करत आहे


 बीड जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण व झेंड्यासाठी वाटेल...राजकीय पक्ष या गोष्टीकडे  दुर्लक्ष का ? करत आहेत. याचा शिवाजी राजांचे शिवसैनिक तथा परळीतील नागरिक याचा संताप व्यक्त करत आहेत


 फेसबुक पोस्ट...खास...!!

मित्रांनो आज माफच करा🙏.


 आज जेव्हा शिवाजी चौकातून जात होतो तेव्हा गेल्या दोन तीन चार महिन्यापासून मनात असलेला संताप अनावर झाला आणि आज व्यक्त करतोय ,गेल्या चार-पाच महिन्यापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकातील खड्डे पाहून व अस्वच्छता पाहून अतिशय मानसिक त्रास होतोय. अगदी स्वच्छ, खड्डे मुक्त आणि निर्मळ असायला हवा असणारा हा चौक अतिशय अस्वच्छ असतो .याचबरोबर फक्त 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येते की काय? यानंतर याकडे सर्वांचीच जाणीवपूर्वक पाठ असते चौकातील हायमाॅस्ट खांबावर असलेला फडफडणारा भगवा पताका/ झेंडा मात्र आज जीर्ण होऊन फाटून त्याच्या चिंध्या चिंध्या झाल्या तरी कोणत्याही सजग मावळ्याची लक्ष याकडे गेले नाही, याचे आश्चर्य वाटते...


 ज्या नावाने राजकारण करतात त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्या पताकाकडे मात्र दुर्लक्ष कसे होते याचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही आणि माझ्यासारख्या सामान्य नागरिकाच्या मनात याचा संताप झाल्याशिवाय रहात नाही.पहा एकदा शिवाजी चौकात येऊन काय झाली त्या झेंड्याची, त्या भगव्या पताकाची अवस्था ज्यासाठी मावळ्यांनी हिंदू धर्म रक्षणासाठी  व छत्रपती संभाजी राजांनी आपली प्राणाची आहुती दिली. 


चौक स्वच्छ आणि ध्वज अभिमानाने फडफडावा आम्हाला आनंद वाटावा एवढीच अपेक्षा.......


 सुनील फुलारी.

 एक सामान्य नागरिक सोबत आत्ता या क्षणी या तारखेला काढलेला फोटो पाठवतोय पहा काय अवस्था आहे झेंड्याची

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

Unknown म्हणाले…
झेंडा फडकावणाराची जिम्मेदारी. फोटो काढताना बर वाटत !