Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळी शहरातील शक्तीकुंज वसाहतीची सुरक्षितता वाऱ्यावर....

 


परळी शहरातील शक्तीकुंज वसाहतीची सुरक्षितता वाऱ्यावर.... नेमकी चोरी होतेच कशी अश्या चर्चा  

परी शहरात गेले दोन महिन्या खाली स्फोटाच्या बातमीने परळीतील औष्णिक विद्युत केंद्राची चर्चा जोरात झाली होती त्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आजही औष्णिक विद्युत केंद्राचा कारभार दिवसेंदिवस गोंधळाला असून नुकतीच भरगच्च वस्तीत असलेल्या कॉलनीत एका  घरात दिवसाढवळ्या चोरी झाल्याची घटना घडली असून याबाबत परळी पोलिसात आज रोजी गुन्हा दाखल झाला आहे.


संतोष बालासाहेब ढाकणे बिल्डिंग नंबर F 38  शक्तीकुंज वसाहत परळी येथे बंद घरातील 2 अंगठी एक 9 ग्राम आणि एक तोळा असे सोने तर नगदी 2500 रुपये चोरी झाल्याचे समोर आले आहे. नूकतेच संभाजी नगर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


 संतोष ढाकणे हे ड्युटीवर गेले असता त्यांची पत्नी ही बाहेरगावी मुलीकडे गेली असल्याच्या सुगाव लागताच चोराने संतोष ढाकणे याचे घर चोरी केली व ऐवज व रोख रक्कम लपंस केली आहे. मात्र शेजारी असणाऱ्यांना याचा थांग पत्ता देखिल लागला नाही हे ही विशेष अन त्या हुन ही विषेश म्हणजे 24 तास सुरक्षा गार्ड आपली ड्युटी बजावत असताना ही नेमकी चोरी होतेच कशी अश्या चर्चा ही परळी शहरात जोर धरत असताना शक्तीकुंज वसाहतीत होताना दिसते आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या