शिवसेना |उषःकाल होता होता
काळरात्र झाली ! अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली!
अखेर आज निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे दोन्ही गटांना वेगवेगळे शिवसेनेचे नाव वापरून येत्या निवडणुकीत निवडणूक लढविण्यास परवानगी मिळाली आहे. महाराष्ट्रात बंडखोरीच्या राजकारणानंतर शिवसेनेमध्ये अनेक सत्ता संघर्षाच्या घटना घडल्या असून तब्बल तीन महिने न्यायालयाच्या निर्णयावर महाराष्ट्राचे राज्य सरकार आणि माजी सरकार शिवसेना कोणाची चिन्ह कोणाचे या घटनेवर पडदा पडला असून..
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळाले असून या पोटनिवडणुकीत याच चिन्हाने आपला उमेदवार व निवडणूक लढवीत येणार आहे. असे या निर्णयात म्हटले आहे.
या सगळ्या घटनाक्रमात काल रात्र झाली या कवितेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही
आम्ही चार किरणांचीही आस का धरावी ? जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी ? कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली!
तेच घाव करिती फिरुनी ह्या नव्या कट्यारी; तोच दंश करिती आम्हा साप हे विषारी !



Social Plugin