Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सावधान | परळीत अज्ञात मोबाईलधारका विरोधात गुन्हा |33 हजारांची फसवणूक

 


सावधान | परळीत अज्ञात मोबाईलधारका विरोधात गुन्हा |33 हजारांची फसवणूक

परळी येथे वर्क फ्रॉम होम मधून पैसे मिळवण्याचे अमिष दाखवून महिलेला 33 हजार रुपयांचा फटका बसल्याचा प्रकार परळी शहरात समोर आला. या प्रकरणी संभाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 


कुरेशी उमामा शबनम निसार अहमद रा.परळी असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांना एका मोबाईलधारकाने एक लिंक पाठवून वर्क फ्रॉम होम मधून पैसे कमावण्याची संधी असल्याचे सांगितले. डिजीटल करन्सीमध्ये आपण काम करत असल्याचे या मोबाईल धारकाने फोन करुन सांगितले. 


उमामा यांनी विश्वास ठेऊन सांगेल त्याप्रमाणे त्याच्या खात्यावर 33 हजार 584 रुपये भरले. मात्र, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी संभाजीनगर पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली. यावरुन अज्ञात मोबाईलधारका विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

*आपला@पेपर*
*हेडलाईन्स न्यूज*

👇
https://chat.whatsapp.com/HY3ddB1QsDx9xtbJEs39Um

*join WhatsApp group:*
*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com

*संतोष बारटक्के*
*9423472426*


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या