वडवणीत वीज कोसळून एक 14 वर्षीय विद्यार्थिनी ठार
बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील सत्तेवाडी येथे शेतात गेलेल्या 14 वर्षीय विद्यार्थिनीच्या अंगावर वीज कोसळल्याने तिचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज सोमवारी रोजी दुपारी घडली आहे.
सीमा धर्मराज पवार वय14 रा. सत्तेवाडी ता.वडवणी असे त्या मृत मुलीचे नाव आहे.सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास सीमा त्यांच्या शेतात कांदा लावत असताना अचानक विजांचा कडकडाट सुरु झाला
यावेळी वीज कोसळून सीमा गंभीर जखमी झाली.तिला तातडीने बीडच्या खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले.


Social Plugin