Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत करोडो रुपये पाण्यातच गेले..| नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया

 


परळीत करोडो रुपये पाण्यातच गेले..|नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया 

परळी येथे काल झालेल्या  परतीच्या पावसाने परळी शहरातील मोंढा मार्केट भागात पाणीच पाणी झाले होते. शहरात नगर परिषदेने रस्ते व नाल्यांचे बोगस कामे केल्यामुळे विकास कामांसाठी आलेले करोडो रुपये पाण्यातच गेले आहेत.अशा प्रतिक्रिया नागरिकांतून येत आहे.








अनेक भागात नाली वर आणि रस्ते खाली अश्या पद्धतीने बांधकाम झालेले आहे त्यामुळे मोंढ्या भागात रस्ताचे चक्क तळेच  झाल्याचा भास होत होता. 



दुकानांच्या चौकटिपर्यंत पाणी पोचले होते.परळी नगरपरिषद नगर विकासाच्या नावाखाली कर पैसे घेतात अन्...हा कर भरणारे व्यापारी पावसाच्या साठलेल्या पाण्याने त्रस्त असताना प्रशासक  मुख्याधिकारी व इतर अधिकारी मात्र आपल्या कार्यालयातून बाहेर पडण्यास सुद्धा तयार नाहीत.



 शहरात नगरपरिषद आहे का ? नगर रचनाकार आहे का ? असा प्रश्न पडावा अशी रस्ते व नाल्यांची बोगस कामे झाली आहेत


  

प्रशासक असलेल्या मुख्याधिकाऱ्यांनी शहरात फिरून नागरिकांच्या समस्या त्वरित जाणून घ्याव्यात व शहरातील नित्कृष्ठ व चुकीच्या झालेल्या रस्ते व नाल्याची कामे दुरुस्त करून व्यापारी व नागरिकांना दिलासा द्यावा

*आपला@पेपर*
*हेडलाईन्स न्यूज*

👇
https://chat.whatsapp.com/HY3ddB1QsDx9xtbJEs39Um

*join WhatsApp group:*
*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या