30शेळ्यांचा जागीच मृत्यू |80 पेक्षाही अधिक शेळ्या बेशुद्ध |अनेक दगावण्याची भीती
अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे अज्ञात कारणाने आतापर्यंत 30शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे.
घाटनांदूर येथून दौंडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला या शेळ्या मृतावस्थेत आढळून आल्या. या व्यतिरिक्त अन्य 80 पेक्षाही अधिक शेळ्या बेशुद्ध अवस्थेत असून त्या देखील दगावण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
यासर्व शेळ्या शंकर दगडू वैद्य यांच्या मालकीच्या असून या घटनेमुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान या शेळ्या कशामुळे दगावल्या यामागचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नसल्याने परिसरातील शेतकऱ्यात दहशत पसरली आहे.


Social Plugin