Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

oil|खाद्य तेल व दाळीचे दर वाढले थेट परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर


 oil|खाद्य तेल व दाळीचे दर वाढले थेट परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर

निवडणूकपूर्वी सर्वत्र मोफत पन सध्या कुटुंबाचे आर्थिक गणित बिघडले


सध्या सामान्याची दिवाळी अगोदरच लॉक डाऊन ने व्यवसाय ठप्प झाल्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे आर्थिक गणित बिघडले असून त्यातच सरकार आणि यंत्रणा याकडे डोळे झाक करत असताना ऐन दिवाळीपूर्वी डाळींचे व तेल oil भाव वाढले आहेत. 


गेल्या आठवड्यात तूर डाळीच्या दरात चार ते पाच रुपयांनी वाढ झाली आहे.यासोबतच उडीद डाळ आणि खाद्यतेलाच्या oil दरातही वाढ नोंदवण्यात आली आहे.डाळींच्या दराचा परिणाम ठोक बाजारासह किरकोळ बाजारावर जाणवू लागला आहे. 


उत्पादनात घट होण्याची भीती असल्याने डाळींच्या किमतीत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठ दिवसांत तूर डाळीच्या दरात चार ते पाच रुपयांनी वाढ झाली.सध्या तूर डाळीचा ठोक बाजारभाव 110 रुपये प्रतिकिलो आहे.तर किरकोळ बाजारात तूर डाळीचा भाव 125 ते 130 रुपये किलो आहे. 


उडीद डाळ 97 ते 100 रुपये किलो दराने उपलब्ध होती. मात्र दिवाळीपूर्वी उडीद डाळीचे भाव 105 ते 110 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.वाढलेल्या दरांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होण्याची शक्यता आहे.


यंदा अतिवृष्टीमुळे कडधान्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसात कडधान्य पिकांचे अतोनात नुकसान झाले.

आगामी काळात कडधान्य पिके कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच डाळींचे भाव वाढू लागले आहेत.


एकीकडे रुपयाचे मूल्यही घसरत आहे. खाद्यतेलाचे oil  दरही वाढण्याची भीती आहे. खाद्यतेल oil तीन ते चार रुपयांनी महागले आहे. त्यात आणखी वाढ होण्याची भीती आहे. दरम्यान, सीएनजीसोबतच पीएनजीचे दरही वाढल्याचे सांगण्यात आले. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होत आहे. 


सीएनजीचे दर वाढल्याने दळणवळण महाग झाले आहे. त्यामुळे भाजीपाला, शेतीमालासह इतर सर्व मालाची वाहतूकही महाग झाली आहे.

दुसरीकडे गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याने डोकेदुखी वाढली आहे. अशातच सणासुदीच्या काळात आता डाळीही महागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या