Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

crime परळीतील युवकाचा पुण्यात संशयास्पद मृत्यू | चौकशीची मागणी

 


परळीतील युवकाचा पुण्यात संशयास्पद मृत्यू | चौकशीची मागणी


परळी तील एक तरुण कोरेगाव पार्क पुणे येथे एका पब बारमध्ये मित्रांसोबत गेले असता तेथील काही व्यक्तीशी शाब्दीक वाद झाला यामुळे त्या पबमध्ये सदरील व्यक्तीशी बाचाबाची होऊन या वादाचे रूपांतर भांडणात झाले. त्या भांडणानंतर परळीतील युवक बेपत्ता झाला आणि दोन दिवसानंतर त्याचा मृतदेह एका नाल्यात आढळला त्यामुळे सदरील घटनेने खळबळ झाली असून मयताच्या आईने चौकशीची मागणी केली आहे.




परळी कै.सुरज रमेश डाहळे वय वर्ष28 यांचा दि1ऑक्टोबर 2022 रोजी शनिवारी रात्री ड्रंक पांडा कोरेगाव पार्क रोड मुंढवा पुणे येथे पब बार मध्ये बसले असता,तेथील काही व्यक्तीशी शाब्दिक वाद झाला. समोरील व्यक्तीने सुरज यास मारहाण केली त्यानंतर सुरज रमेश डहाळे  बेपत्ता झाला त्याचा मोबाईल बंद येत होता.



दिनांक 2 ऑक्टोबर 2022 रविवार रोजी नातेवाईक व मित्रपरिवाराशी चौकशी केली पण तो बेपत्ता झाल्याने त्यांनतर सुरज बेपत्ता झाल्याची मुंढवा पुणे पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली त्यानंतर दि. 3 ऑक्टोबर 2022 सोमवार रोजी खराडी ते चंदन नगर या हद्दीत पवार वस्ती येथे त्याचा मृतदेह आढळून आला.


हा सर्व घटनाक्रम संशयास्पद वाटत असल्याने.श्रीमती माधुरी रमेशराव डहाळे यांच्या पतीचे नुकतेच अपघाती निधन झाल्याने त्यांचाएकुलता एक मुलगा सुरज होता तो ही काळाने क्रूर पद्धतीने हिसकावून नेल्याने त्या ही दुःखात बुडाल्या असून त्या मातेला न्याय मिळावा व कै.सुरज यांच्या मृत्यूचा शोध घेऊन संबंधितावर कडक कारवाई करावी  व न्याय द्यावा  अशा मागणीची निवेदन माजी मंञी धनंजय मुंडे यांना देण्यात आले आहे.


5 G |महत्त्वाची बातमी |सायबर क्राईमच्या नवीन प्रकाराला बळी पडू नका |*
👇👇👇👇👇👇



यावेळी सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष सुरेश टाक ,सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राहुल टाक ,परळीचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉ.शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी,सुनील मामा दहिवाळ ,उपाध्यक्ष अमोल डहाळे, संतोष टाक ,प्रशांत शहाणे ,एडवोकेट अशोक शहाणे, संतोष उदावंत ,रवी डहाळे ,निलेश मैड,सौरभ बोकन, सतीश मैड ,अश्रफुल बंगाली, सचिन दहिवाळ, अभिजीत कदम ,संजू बंगाली आदी उपस्थित होते.


*आपला@पेपर*
*हेडलाईन्स न्यूज*

👇
https://chat.whatsapp.com/HY3ddB1QsDx9xtbJEs39Um

*join WhatsApp group:*
*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या