Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

एन् दिवाळीत संपूर्ण ग्रामीण भागात अंधार कायम |






जनजीवन पूर्ण विस्कळीत.... 

परळी तालुक्यातील ग्रामीण भागात सर्वत्र अंधार असून विजेचा खेळखंडोबा झाला आहे.  वीज पुरवठा खंडित असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहेत. अगोदरच शेतकरी संकटात असताना त्यात पुन्हा विजेचा संकट म्हणजे वीज पुरवठा नसल्या कारणाने दूरसंचार सेवा देखील विस्कळीत झाली असुन बीएसएनएल व जिओ कंपनीचे नेटवर्क गुल झाले आहे.


परळी तालुक्यातील शहरापासून सर्वात दूर अंतरावर महत्वाचे गाव असलेल्या मोहा गावासह तालुक्यातील ग्रामीणचा अर्धा भाग संपूर्णतः अंधारात असल्यामुळे   वीज पुरवठा खंडित का ?झाला आहे. एकीकडे परतीच्या पावसाचा जोर कमी होण्याची चिन्ह दिसून येत नाहीत यातच गावात वीज पुरवठा खंडित असल्याने जनजीवन पूर्ण विस्कळीत झाले आहे. 


दैनंदिन जीवनावश्यक कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विद्युत वीजेवर चालणारी कामे ३ दिवसापासून ठप्प पडली आहेत. यातच वीज पुरवठा नसल्या कारणाने दूरसंचार सेवा देणाऱ्या बीएसएनएल व जिओ कंपनीचे नेटवर्क देखील गुल झाले असल्याने संपर्क यंत्रणा देखील ठप्प पडली आहे. याबाबत वीज वितरण विभागाशी संपर्क केला.असता नेहमीप्रमाणे कुठलाही रिस्पॉन्स नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या