Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

स्वस्त धान्य दुकानात 100 रुपयांमध्ये | चार खाद्यपदार्थ मिळणार |


स्वस्त धान्य दुकानात 100 रुपयांमध्ये चार खाद्यपदार्थ मिळणार |

*थेट !आपल्या मोबाईलमध्ये बघा...

*आपल्या हक्काचे किती रेशन आहे? हे आपल्याला कळेल*.


https://aplaepaper.blogspot.com/2020/04/blog-post_87.html


स्वस्त धान्य दुकानात 100 रुपयांमध्ये चार खाद्यपदार्थ मिळणार |अंगठा लावून पावती न देता आगाऊ पैसे देऊ नका|नाव असूनही स्वस्त धान्य मिळत नसेल तर तक्रार करा .अर्ज करा.. 


दिवाळीनिमित्त राज्य सरकारने सर्व शिधापत्रिकाधारकांना अवघ्या 100 रुपयांमध्ये चार खाद्यपदार्थांचा संच देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार परळी व तालुक्यातील शिधापत्रिका धारकांना यासंचाचा लाभ मिळणार आहे.

यासंचाचा लाभ घेण्यास पात्र असलेल्या तालुक्यातील  लाभार्थ्यांनी या वस्तूचा लाभ घ्यावा असे आवाहन परळी तहसीलदार सुरेश शेजुळ व पुरवठा विभागचे बी.एल.रुपनर यांनी आवाहन केले आहे.


राज्य सरकारने रवा, साखर, चनाडाळ प्रत्येकी 1 किलो, पामतेल प्रत्येकी 1 लिटर अंत्योदय, प्राधान्य कुटुंब लाभार्थी आणि शिधापत्रिका धारकांना प्रत्येकी 1 किलो अशा चार वस्तू दिल्या जाणार आहेत. या योजनेंतर्गत नियमित धान्यासोबत 3 किलो गहू, 2 किलो तांदूळ असे 5 किलो धान्य प्रति व्यक्ती मोफत वाटण्यात येणार आहे.

सदर वस्तू  वितरणासाठी प्राप्त झाल्या आहेत. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे.

 त्यामुळे सणासुदीच्या काळात शिधावाटप दुकानदारांनी विना तक्रार जनतेचे लोकसेवक या नात्यातून ग्राहकांना हा लाभ देण्याचा प्रयत्न करावा ही पंतप्रधान योजना गोरगरिबांच्या हिताची असून यात भ्रष्टाचार आणि काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

@शिधापत्रिकाधारकांना विलंबाने रेशन घेऊन जाण्यास कळवावे.

@रेशन दुकाने दिवसातून दोनदा उघडावीत.

@तसेच दुकानात येणाऱ्या रेशनबाबत जनतेला माहिती व्हावी यासाठी दर्शनी भागात साठा व किंमतीचे फलक लावावेत,

@रेशन दुकानदारांना साइनबोर्डवर दुकान उघडण्याची आणि बंद करण्याची वेळ नमूद करणे बंधनकारक आहे.

@दुकान अचानक बंद करणे आवश्यक असल्यास अशा सूचना दुकानाच्या बाहेरील बाजूस व दर्शनी भागावर स्पष्ट व ठळक अक्षरात लिहिणे बंधनकारक आहे.

@दिवाळीनिमित्त लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार्‍या किटचे वेळेवर व नियमित वाटप करण्यात येणार आहे.

@या वितरणावर तपासणी अधिकारी व पुरवठा निरीक्षकांनी लक्ष ठेवावे अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत .

@रेशनचे धान्य बाहेर विकणाऱ्यांवर कारवाई होणार

काही रेशनधारक स्वस्त धान्य दुकानातून मोफत व स्वस्त धान्याची विक्री करत असल्याच्या तक्रारी आहेत. सदर धान्य बाहेर विक्री केल्याचे आढळून आल्यास संबंधित शिधापत्रिका धारकांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. तसेच त्यांना स्वस्त धान्याची गरज नसल्याने त्यांचे शिधापत्रिका रद्द करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली आहे

.परिस्थितीत कोणत्याही कार्डधारकांना मोफत धान्य मिळण्यास अडचण येत असल्यास ते संबंधित जिल्हा अन्न व पुरवठा नियंत्रक कार्यालयात किंवा राज्य ग्राहक सहाय्य केंद्रावर त्याबद्दल तक्रार करू शकतात.

यासाठी सरकारने 1800-180-2087,

1800-212-5512
1966,1967 टोल फ्री क्रमांक जारी केले आहेत.

या नंबरवर ग्राहक त्यांची तक्रार नोंदवू शकतात. अनेक राज्य सरकारांनी स्वतंत्रपणे देखील हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत

याबाबत परळी व तालुक्यातील  स्वस्त धान्य दुकानदाराबाबत काही तक्रार असेल तर या मेल आयडीवर pressibn@gmail.com  व वैजनाथ माने (शिं,ग.शिवसेना ) 9404707777 तकार पाठवा...आपला स्वतःच्या अक्षरातील तक्रार ,अर्ज, फोटो रेशन काड झेराॕक्स , हुजत घालणाऱ्या दुकानदार व ग्राहकांची व्हिडिओ  आम्ही या तक्रारीत प्रसारमाध्यमाच्या द्वारे दाखल करू फोटो सहित करावा यावर तुमच्यावर झालेल्या अन्यायाची दखल घेतल्या जाईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या