Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

TET घोटाळ्यातील शिक्षकांना दिलासा देणारी बातमी सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय

 


TET घोटाळ्यातील शिक्षकांना दिलासा देणारी बातमी सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय


महाराष्ट्रात नुकताच उघडकीस आलेला टीईटी घोटाळ्यात 780 शिक्षकांनावर कारवाई करण्यात आली होती ती कारवाई थांबवावी व शिक्षकांच्या मतांचा विचार करावा तोपर्यंत त्यांची पगार पूर्वीसारखे सुरू ठेवावी अशी मागणी ऍडव्होकेट टोपे यांच्या वतीने न्यायालयात केली होती त्यावर आज सुनावणी होऊन..

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अधिवक्ता संभाजी टोपे यांनी शिक्षकांच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात बाजू मांडली होती.


टीईटी घोटाळ्याशी संबंधित 780 शिक्षकांवर कारवाई करण्यात आली.ही कारवाई करताना संबंधित शिक्षकांना बाजू मांडण्याची संधी देण्यात आली नाही.त्यामुळे काही शिक्षकांनी औरंगाबाद खंडपीठात केस दाखल आहे.शिक्षकांच्या मते ही कारवाई एकतर्फी आहे. 


अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमध्ये TET परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य नाही.त्याचप्रमाणे आठवीनंतरच्या इयत्तांसाठी पात्रता परीक्षेची गरज नाही.नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार ज्या शिक्षकांवर कारवाई झाली आहे,त्यांना त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार आहे. 


शिक्षकांनी अॅड.मार्फत खंडपीठाकडे धाव घेतली होती. काही शिक्षकांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेत सरकारने घेतलेला निर्णय अन्यायकारक असल्याचे सांगितले.पुढील निर्णय होईपर्यंत काम सुरू ठेवावे आणि पगार नियमित सुरू ठेवावा,असे निर्देश न्यायालयाने दिले. 



याआधी मुंबई उच्च न्यायालयाने नागपूर खंडपीठात काही याचिका दाखल करून कामकाज सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र,औरंगाबाद खंडपीठात पगार सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्याने अन्य याचिकाकर्त्यांना फायदा होणार असल्याची माहिती अॅड.संभाजी टोपे यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या