Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

शिक्षण खात्यात एजंटचा बोल बाला | मुख्याध्यापकास अटक |शैक्षणिक वर्तुळात खळबळ


काही शिक्षण खात्यात एजंटचा बोल बाला | मुख्याध्यापकास अटक |शैक्षणिक वर्तुळात खळबळ 


सर्व शिक्षण ऑनलाईन असताना शिक्षण खात्यातील सर्व ऑफिस ऑफलाईन आहेत प्रत्येक जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शिक्षण खात्यात एजंट नेमलेले असून या एजंट द्वारे मान्यतेचा प्रस्ताव वैद्यकीय बिल असो या अजून कुठलेही काम असो असे अनेक गैरव्यवहार खुलेआम पणे होत आहेत. सरकारने सेवेसाठी नेमलेल्या या काही लोकांनी शिक्षणाचा अक्षरशः बाजार मांडला असून शिक्षणासारख्या चांगल्या क्षेत्राला काळीमा फासली असून एखाद्या दुसरे अशा प्रकरणाने शिक्षण क्षेत्राला काही फरक पडत नाही दिवसागणिक असे लाखो व्यवहार या महाराष्ट्रात होत असून याकडे मात्र अँटि... नेहमी दुर्लक्ष करते याचे गुपित अनेकांना कळले नाही अशी चर्चा या अनुषंगाने होत आहे


लातूर येथील सदानंद प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या शिक्षिकाने घरगुती कामासाठी एक आठवड्याची रजा घेतली होती. त्यास मान्यता देण्याची विनंती प्राचार्यांना केली.त्याने ते टाळले.अखेर तक्रारदाराच्या पत्नीला एका आठवड्याची रजा मंजूर करण्याच्या उद्देशाने शाळेत बोलावण्यात आले.


यावेळी त्यांच्याकडे पंचासमक्ष सात हजारांची लाच मागितली. अखेर तडजोडीनंतर सहा हजार रुपये देण्याचे ठरले. यासंदर्भात लातूर येथील शिक्षिकेच्या पतीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन तक्रार दिली.तक्रारीची शहानिशा केल्यानंतर बुधवारी दुपारी एसीबीने शाळेतच सापळा रचण्याचा घाट घातला. 



मुख्याध्यापक सुधाकर जगन्नाथ पोतदार (वय 55) आणि लिपिक शशिकांत विठ्ठलराव खरोसेकर (वय 54) यांना 5 हजार रुपयांची लाच घेताना पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईने लातूरच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती,अशी माहिती एसीबीचे पोलिस उपअधीक्षक पंडित रजितवाड यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या