महिलेची हत्या करून फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात
पूर्णा येथील रेल्वे परिसरात महिलेची हत्या करून फरार झालेल्या खून प्रकरणातील आरोपीला परभणी पोलिसांनी हैदराबाद येथे जाऊन अटक केली आहे.
संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजणाऱ्या या घटनेत अखेर परभणी पोलिसांनी हैदराबाद येथून आरोपी अरबाज खान वय 26 वर्ष यास अटक केली आहे. नुकतेच दोन महिन्यापूर्वी लग्न झालेल्या शेख अरबाज खान या आरोपीने पती-पत्नीच्या कौटुंबिक वादातून पत्नी ची हत्या केल्याचे कबूल केले आहे याबाबत घटनेतील प्राथमिक माहिती मिळाली आहे. याबाबत पोलीस अधिक तपास व चौकशी करत आहेत.

Social Plugin