Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

नेमके काय म्हणाले |परळीत इंदुरीकर महाराज |वाचा बातमी मागची खरी बातमी..

 जिसका नाम होता है उसको ही बदनाम किया जाता है | माजी मंत्री धनंजय मुंडे






नेमके काय म्हणाले परळीत इंदुरीकर महाराज वाचा बातमी मागची खरी बातमी..

परळी येथील मोंढा मार्केट परिसरात नाथ प्रतिष्ठान आयोजित वैद्यनाथ गणेश उत्सव दरम्यान ह भ प निवृत्ती महाराज देशमुख यांचे प्रबोधनपर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान व्यासपीठावर दोन्ही बाजूने असलेल्या कॅमेऱ्याकडे पाहून त्यांनी थोडे मनातील भाव व्यक्त केले.

अनेक वेळा इंदुरीकर महाराज मीडियाला किंवा कुणालाही त्यांचे कीर्तन शूट करू देत नसल्याचे आपण पाहतो.यावेळीही अशीच घटना घडली आहे.इंदुरीकर महाराजांनी यावेळीही असाच पवित्रा घेत मीडियाचे कॅमेरे बंद करण्यास सांगितले.ही सर्व व्यावसायिक मंडळी आहेत. 


टीआरपीसाठी कोणी कितीही मानहानी करतील याचा नेम नाही कारण मी तो सर्वात जास्त त्रास सहन केला आहे आणि अजूनही भोगत आहे इंदोरीकर महाराजांनी व्यथा व्यक्त केली.

तसे पाहता कालच्या प्रबोधन कीर्तनात त्यांनी मुलांपासून मोबाईल दूर ठेवणे तथा प्रत्येक घरोघरी सौर ऊर्जा वर चालणारे विजेचे उपकरणे विद्यार्थ्यांना गृहपाठामध्ये परमार्थ विषयक पसायदान तसेच जनजागृती पर अनेक मुद्दे विशेष करून लहान मुलांच्या बाबतीत होत असलेले दुर्लक्ष याकडे लक्ष देणे ही काळाची गरज आहे असे त्यांनी नमूद केले होते.

 या सर्व मुद्द्याकडे अनेक प्रसार माध्यमांनी दुर्लक्ष करून नको त्या गोष्टीला जास्त प्रसिद्ध केले जात आहे त्यामुळेच या कार्यक्रमाच्या दरम्यान माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी बोलताना एक शेर नेहमीच उल्लेख केला आहे तो की जिसका नाम होता है उसको ही बदनाम किया जाता है याच व्यासपीठावर कार्यक्रमापूर्वी त्यांनी म्हटले होते अगदी तसेच प्रसार माध्यमाच्या या बातम्या मधून दिसते आहे.

परळीकरांना बोलताना इंदुरीकर महाराज पुढे म्हणाले की,"माझे कीर्तन हे लोकांसाठी आहे.दोन तास शूट करायला हरकत नाही.पण काही मीडियावाले कधीच पूर्ण कीर्तन दाखवत नाहीत.ते येथे एक वाक्य घेईल ते तेथे एक वाक्य घेतील. इतरांची वाट लावतात...त्यामुळे टीआरपी त्यांचा वाढतो.पण इतरांची वाट लागते असेही इंदुरीकर महाराज म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या