Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

माजलगाव धरणात पोहण्यासाठी गेलेल्या डॉक्टरचा मृतदेह सापडला

 




पोहण्यासाठी गेलेल्या डॉक्टरचा मृतदेह आज सकाळी पाचच्या दरम्यान सापडला पाण्यात बुडून मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे

माजलगाव येथील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या डॉक्टरचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी आठ वाजे दरम्यान घडली होती.

दरम्यान ते खोल पाण्यात गेल्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला होता तब्बल दोन दिवस कोल्हापूर बीड परळी येथील बचाव पथकाने त्यांचे शोध कार्य सुरू केले होते परंतु दोन दिवसानंतर आज सायंकाळी त्यांचा मृतदेह सापडला

डॉ.दत्ता फपाळ वय 40 वर्ष रा. बेलुरा ता.माजलगांव मयत डॉक्टरचे नाव आहे. ते सकाळी मित्रांसमवेत माजलगाव येथील दिंद्रुड परिसरात असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेले होते.दरम्यान तळ्यातील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी बीड जिल्हाधिकारी शर्मा स्वतः उपस्थित राहून सदरील आपत्कालीन पथकातही स्वतः हजर होते तसेच माजलगाव तहसीलदार वर्षा मनाळेसह माजलगाव पोलीस दाखल झाले आहेत.

 डॉ.फपाळ यांचा तेलगाव येथे दवाखाना असून तेलगाव परिसरात सुप्रसिद्ध असलेल्या डॉक्टरचा मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या