Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

हॉटेल निसर्गाजवळ अंबाजोगाई केज रस्त्यावर अपघात | एक ठार



हॉटेल निसर्गाजवळ
अंबाजोगाई केज रस्त्यावर अपघात | एकाचा जागीच मृत्यू

केज-अंबाजोगाई रोडवरील चंदन सावरगावजवळील हॉटेल निसर्ग येथे अपघात. या घटनेत महेश अंबादास पेटलपट्टी (वय 27, रा. सोलापूर) यांचा मृत्यू झाला. 


यात अधिक माहिती अशी की,केज-अंबाजोगाई रस्त्यावरील चंदन सावरगाव जवळील हॉटेल निसर्गाजवळ अंबाजोगाईकडून केजकडे येणाऱ्या मालवाहू वाहनाचा क्र. एमएच-43 एडी 7210 टायर फुटून चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. 


यावेळी केजकडून अंबाजोगाईकडे जाणाऱ्या कारला क्र. एमएच 13 सीके 2614 या वाहनाची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात कारमधील प्रवासी महेश अंबादास पेटलपट्टी वय 27, रा. सोलापूर यांचा मृत्यू झाला तर व्यंकटेश भूपेंद्र इंगळे वय 47, रा. सोलापूर हे गंभीर जखमी झाले. 


अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी रुग्णवाहिकेतील जखमींना स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे दाखल केले. युसूफवडगाव पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अपघातस्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या