पंकजाताई मुंडेंच्या उपस्थितीत परळीत 'सेवा पंधरवडा' चे आयोजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य ; रक्तदान शिबीर, स्वच्छता मोहिम, वृक्षारोपण आदींचं आयोजन
परळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस संपूर्ण देशभर 'सेवा पंधरवडा' म्हणून साजरा होत असून त्या अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून परळीत येत्या रविवारी दि.२५ रोजी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबीर, स्वच्छता मोहिमेसह विविध 'सेवा उपक्रम' आयोजित करण्यात आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस १७ सप्टेंबर ते महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर या दरम्यान भाजपच्या वतीने 'सेवा पंधरवडा' राबविण्यात येत आहे.


Social Plugin