Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

|धक्कादायक व्हिडिओ अग्नवीर’ सैन्य भरतीसाठी जाणाऱ्या विद्यार्थीचा रेल्वे अपघातात मृत्यू

 


धक्कादायक व्हिडिओ अग्नवीर’ सैन्य भरतीसाठी जाणाऱ्या  विद्यार्थीचा रेल्वे अपघाताची घटना 

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘अग्नवीर’ सैन्य भरतीसाठी वडजई, सौंदाणे बाभूळवाडी गावातील एकूण पंचवीस ते तीस मुले मंगळवारी रात्री चाळीसगाव येथून भरतीसाठी मुंबईला गेली. बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हे सर्वजण कल्याणमध्ये पोहोचले. 


तेथून हे तरुण ‘अग्नीवीर’च्या भरतीसाठी मुंब्रा येथे जात होते. मात्र, रामेश्वर भरत देवरे यांना मळमळ होऊ लागल्याने ते उलट्या करण्यासाठी रेल्वे रुळावर गेले. वाकून उलट्या होत असताना रामेश्वरचे डोके लोकल ट्रेनने आदळले. तो 10 ते 15 फूट दूर फेकला गेला. 


या अपघातास कारणीभूत असलेले रेल्वे स्टेशन प्रशासन होय अनेक रेल्वे स्टेशनवर पिण्याचे पाणी और हात धुण्याचे अटी बनवण्यात आलेले नळाला पाणी नसते तसेच सतत इथं घाण असते त्यामुळे नाईलाजाने अशा व्यक्ती रेल्वे रुळाकडे जातात म्हणून या दुर्दैवी घटना घडत आहेत.


या अपघातात रामेश्वरचा जागीच मृत्यू झाला. रामेश्वरच्या अपघाती मृत्यूने मित्रांनाही धक्का बसला. रामेश्वर यांच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.


मनाला विचलित करायला व्हिडिओ असल्यामुळे तो डिलीट करण्यात आला..


#अग्नीवीर_भरती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या