Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

'या' शाळेतील चिमुकल्यांनी खाऊच्या पैशातून केली शहीद जवान मोरे यांना मदत..


#सिंदफणा_पब्लिक_स्कूल माजलगाव तर्फे शहीद जवान राज शेखर मोरे यांना आर्थिक मदतीचा हात


आपणही समाजाचे काही देणे लागतो म्हणून या शाळेतील चिमुकल्यांनी खाऊच्या पैशातून केली शहीद जवान मोरे यांना मदत.....माजलगाव येथे धरणावर पोहण्यासाठी गेलेले डॉ.दत्ता फपाळ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यांचा मृतदेह शोधण्यासाठी के डी आर एफ जवानांची टीमला कोल्हापूर येथून शोधकार्यास पाचारण करण्यात आले होते.



मात्र शोध कार्य करत असताना त्यातील एक जवान राजशेखर मोरे हे मच्छीमारांच्या जाळ्यात अडकून शहीद झाले.त्या परिवारातील कमवता माणूस गेल्यामुळे यांचा परिवार हा मोठ्या संकटात सापडला आहे त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे माजलगाव तालुक्या मधून सर्व स्तरातून त्यांना मदत म्हणून मोठ्या प्रमाणात मदत निधी जमा करण्यात आला आहे.



आपणही समाजाचे काही देणे लागतो ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून सिंदफणा पब्लिक स्कूल माजलगावच्या सर्व विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी शहीद जवान राजशेखर मोरे यांच्या कुटुंबीयांना ३३४८१- रुपयांची आर्थिक मदत माजलगावच्या तहसीलदार वर्षा मनाळे यांच्याकडे सिंदफणा पब्लिक स्कूलचे प्राचार्य अन्वर शेख सर,उपप्राचार्य राहुल कदम सर आणि माध्यमिक विभागाचे प्रमुख जीबी ऑगस्टन सर यांनी सुपूर्त केलेली आहे.

विद्यार्थ्यांनी या केलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.


#सिंदफणा_पब्लिक_स्कूल


*हेही वाचा अबब...परळीत देवीचे चमत्कारीक रुप |एक अद्भुत कालराञी देवीचे हे रुप तुम्ही कधीच पाहिले नसेल...तर*

👇👇👇👇👇👇👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2022/09/blog-post_61.html*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या