भीषण अपघात| पत्नीचा मृत्यू,पती आणि मुलगी जखमी
अंबाजोगाई - येथील प्रतिष्ठित व्यापारी जितेंद्र झंवर (वय ४८) हे पत्नी आणि मुलीसह औरंगाबादहून अंबाजोगाईकडे येत असताना बीड जवळ कोळवाडी येथे त्यांच्या कारचा अपघात झाला आहे.
नवीन दुकानाचा शुभारंभ करण्यासाठी म्हणून औरंगाबाद येथे गेलेल्या आंबेजोगाईतील प्रतिष्ठित व्यापारी जितेंद्र झंवर यांची पत्नी मुलगी स्वतः हे औरंगाबाद येथून आंबेजोगाईकडे येताना सदरील घटना घडली आहे अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.
याभीषण अपघातात जितेंद्र झंवर यांची पत्नी ज्योती वय ४६ यांचा जागीच मृत्यू झाला.तर,मुलगी रजत वय १९ आणि स्वतः जितेंद्र हे गंभीर जखमी झाले आहेत.हा अपघात शुक्रवारी पहाटे दिड वाजताच्या सुमारास झाला आहे.


Social Plugin