Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अबब..परळीत महाराष्ट्राची हास्य जत्रा...सोमवारच्या सायंकाळी रंगणार

 *लालबागचा राजा.थेट LIVE  तुम्ही आताही पाहू शकता...... *https://aplaepaper.blogspot.com/p/youtube-video-player.html*


अबब..परळीत महाराष्ट्राची हास्य जत्रा...सोमवारच्या सायंकाळी  रंगणार 

प्राजक्ता माळी, समीर चौगुले, गौरव मोरे, प्रसाद खांडेकर आदी कलाकारांच्या उपस्थितीत हास्याची रंगणार जत्रा

परळी येथे आ.धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या  वतीने परळी शहरात आयोजित वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवात सोमवारची सायंकाळ परळीकरांसाठी सोनी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' परळीत घेऊन येणार आहे. 

अभिनेत्री प्राजक्ता माळी, विनोदी कलाकार समीर चौगुले, गौरव मोरे, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, शिवाली परब, पृथ्वीक प्रताप, चेतना भट आदी कलाकारांच्या माध्यमातून सोनी मराठी या वाहिनीवर नेहमी रंगणारी महाराष्ट्राची हास्य जत्रा, धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून परळी वासीयांना प्रत्यक्ष परळीत पाहायला मिळणार आहे. 

नेहमी टेलिव्हिजनवर पाहिलेले विविध कलाकार, त्यांचे कलाविष्कार हे यंदाच्या नाथ प्रतिष्ठान आयोजित वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवात सर्व परळी वासीयांना प्रत्यक्ष परळी शहरात पाहायला मिळत आहेत. 

दरम्यान शहरातील मोंढा मैदान येथे सुरू असलेल्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवात सोमवारी सायंकाळी 7 वा महाराष्ट्राची हास्य जत्रा अवतरणार असून, या कौटुंबिक विनोदी कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन नाथ प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या