Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

स्पर्धकांचा आनंद द्विगुणित |पंकजाताई मुंडे,डॉ.प्रितमताई मुंडे घरोघरी जाणार...

 


स्पर्धकांचा आनंद द्विगुणित |पंकजाताई मुंडे,डॉ.प्रितमताई मुंडे घरोघरी जाणार...

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या गौरी-गणपती स्पर्धा महोत्सवासाठी दोन हजार स्पर्धकांची नोंदणी परळीत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आणि द टर्निंग पॉइंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गौरी गणपती स्पर्धा महोत्सवासाठी सुमारे दोन हजार ३९१ स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. आज सोमवार  दि 5 रोजी भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजाताई मुंडे, मा.डॉ.प्रितमताई मुंडे या स्पर्धकांच्या घरोघरी जाऊन देखाव्याची पाहणी करणार आहेत. 


तज्ञ महिला परीक्षकांच्या देखरेखीखाली स्पर्धेचे परीक्षण केले जाईल.गेल्या दोन वर्षांपासून यास्पर्धा कोरोनामुळे होऊ शकल्या नव्हत्या, मात्र यंदा कोरोनाचा धोका दूर झाला असून सर्वत्र गणेशोत्सव उत्साहात साजरा होत असल्याने या स्पर्धाही मोठ्या उत्साहात पार पडल्या आहेत. यंदा स्पर्धेबाबत नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह आणि उत्सुकता असल्याने ही संख्या दुप्पट झाली आहे. विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षिसे आणि सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व भेटवस्तू दिली जातील. 


संस्थेच्या वतीने,स्पर्धेची संपूर्ण तयारी घरोघरी स्पर्धकांनी त्यांच्या उत्कृष्ट प्रदर्शनासाठी केली आहे. 

पंकजाताई,प्रितमताई करणार पाहणी; तज्ज्ञ परीक्षकांचे पथकही सज्ज...

पंकजाताई मुंडे आणि श्री.डॉ. प्रितमताई मुंडे या आज सोमवारी गौरी विसर्जनदिवशी यास्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांच्या घरी जाऊन देखाव्याची स्वतः पाहणी करणार आहेत. सुमारे 92 तज्ज्ञ महिला परीक्षकांचे पथक स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी सज्ज असून आज सोमवारी सकाळी 9 वा. या टीमकडून प्रत्येक स्पर्धकाच्या घरी जाऊन देखावा आणि सजावटीची पाहणी केली जाईल. 

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भाजप आणि टर्निंग पॉइंटचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. दरम्यान, पंकजाताई आणि प्रितमताई रंगरूप तपासण्यासाठी घरी येणार असल्याने स्पर्धकांचा आनंद द्विगुणित झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या