Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत |आज गौरी-गणपती स्पर्धा महोत्सवाचे |पारितोषिक वितरण होणार |






#सौ.पंकजाताई_मुंडे_खा.डॉ.प्रितमताई_मुंडे यांच्या  उपस्थितीत स्पर्धकांना बक्षीस वितरण होणार...


|गौरी-गणपती स्पर्धा महोत्सवाचे पारितोषिक वितरण या दिवशी होणार...परळी येथे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आणि द टर्निंग पॉईंट आयोजित गौरी-गणपती स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण दि 27 सप्टेंबर रोजी एका दिमाखदार सोहळ्यात करण्यात येणार आहे.यावेळी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे आणि डॉ. प्रितमताई मुंडे उपस्थित राहणार आहेत. 


शहरातील स्थानिक कलाकार आणि गृहिणींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने या स्पर्धा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.


परळीत दि.27 रोजी दुपारी साडेचार वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील अक्षता मंगल कार्यालयात कार्यक्रमाची सांगता बक्षीस वाटपाने होणार आहे



स्पर्धा महोत्सवाचा एक भाग म्हणून बाल गणेश मंडळ, होम गणेश सजावट, महालक्ष्मी मखर सजावट आणि देखावा,मंगलमूर्ती मिरवणूक देखावा या स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या.


महालक्ष्मी देखावा स्पर्धेसाठी 

प्रथम पारितोषिक डबल डोअर फ्रिज, 

द्वितीय मायक्रोवेव्ह,

तृतीय स्मार्ट फोन 

दहा प्रोत्साहनपर स्पर्धकांना टोस्टर,



बाल गणेश मंडळ स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक .

घगुती गणेश सजावट आणि मंगलमूर्ती मिरवणूक देखावा 

स्पर्धेसाठी11,000, 

द्वितीय, 9,000, 

5,000 आणि 3,000 रुपयांची बक्षिसे दिली जातील. 


सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रे आणि भेटवस्तू दिल्या जातील. पंकजाताई, प्रितमताई यांच्या भेटीने स्पर्धकांचा आनंद द्विगुणित झाला होता.


या सर्व स्पर्धांचे तज्ञ परीक्षकांकडून परीक्षण करण्यात आले असून कार्यक्रमात बक्षिसे दिली जातील. यावेळी स्पर्धक,नागरिक, पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.


#सौ.पंकजाताई_मुंडे_खा.डॉ.प्रितमताई_मुंडे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या