Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत पुन्हा एकदा नवरात्रीच्या अनुषंगाने भक्तीचा जल्लोष साजरा होणार..

 


परळीत पुन्हा एकदा नवरात्रीच्या अनुषंगाने भक्तीचा जल्लोष साजरा होणार..

नाथ प्रतिष्ठान आणि राधा मोहन प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने तसेच माजी मंत्री धनंजय मुंडे व वाल्मीक कराड,चंदुलाल बियाणी यांच्या संकल्पनेतून.....

परळीतील औद्योगीक वसाहत येथे दुमजली वैष्णोदेवी दर्शन देखावा हुबेहुब पद्धतीने साकारला जाणार आहे. देखाव्यात वैष्णोदेवीचे चरण दर्शन, तसेच आसपासचे विविध मंदीरे  मुख्य मुर्ती, हुबेहूब भुयारी मार्ग साकारला जात आहे. या देखाव्याचे एकुण अंतर 700 फुट एवढे असून डोंगर-दऱ्या आदींचे स्वरुप एकाच मंडपात तेथे साकारले जाणार आहे.


या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर परळी शहर व परिसरातील भाविकांना वैष्णोदेवी दर्शनाचा साक्षात अनुभव व्हावा, असा संयोजक चंदुलाल बियाणे यांचा  प्रयत्न असून त्याची अनुभूती अधिक चांगल्या पद्धतीने यावी या दृष्टीकोनातून कटरा-जम्मू कश्मिर येथे वैष्णोदेवी मंदीरात असलेली ज्योत दुसऱ्या ज्योतीला प्रज्वलीत करुन अखंड दिव्य-ज्योत परळीत आणली जाणार आहे. दिव्य ज्योत आणण्यासाठी परळी येथून विशेष वाहन तयार करण्यात आले असूनते माता वैष्णवी देवी इकडे रवाना झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या