Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत बेशिस्त आणि भरधाव वेगातील वाहनामुळे एका वयोवृद्धचा मृत्यू

 


परळीत बेशिस्त आणि भरधाव वेगातील वाहनामुळे वयोवृद्ध विजयकुमार चांडक यांचे निधन




परळी शहरातील सकाळी मॉर्निंग वॉक करण्यासाठी फिरायला आलेल्या वयोवृद्धला भल्या पहाटे मोंंढा मार्केट येथे मोटरसायकलवर भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रिपल सीट मोटरसायकल स्वरांनी जोराची धडक दिल्यामुळे वयोवृद्धाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. आज या अपघातातील वयोवृद्धाचा मृत्यू झाला आहे.


परळीतील औद्योगिक वसाहती मधील उद्योजक विजयकुमार चांडक शनिवारी सकाळी साडेसहा वाजता फिरत असताना भरधाव वेगाने मोटरसायकल आलेल्या ट्रिपल सीट मोटर सायकल स्वाराने श्रद्धा क्लॉथ सेंटर समोर जोराची धडक देऊन गंभीर जखमी केले होते यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव खूप झाला होता.

अपघातानंतर परळी ग्रामीण रुग्णालयात उपचारसाठी नेले असता गंभीर जखमीला त्यांनी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात घेऊन जा असे सांगण्यात आले.

अंबाजोगाई  येथेही त्यांच्यावर उपचार करण्यात आले नाही आंबेजोगाई येथू लातूर येथील रुग्णालयात घेऊन जा असे सांगितल्यानंतर सह्याद्री हॉस्पिटल लातूर येथे विजयकुमार चांडक यांना दाखविण्यात आले.

डोक्याच्या मेंदूला मोठ्या प्रमाणात मार लागला होता, मार मोठ्या प्रमाणात लागल्यामुळे रक्तस्त्राव जास्त प्रमाणात झाल्यामुळे लातूर येथे त्यांच्या उपचार सुरू होते त्यादरम्यान ते रविवार रोजी संध्याकाळी त्यांचे निधन झाले.

मृत्यू समयी त्यांचे वय ७२ वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले निशिकांत व नितीन एक मुलगी असा परिवार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या