Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

तब्बल 8 तास सर्च ऑपरेशन करुनही बुडून मृत्यू झालेल्या डॉक्टरांचा शोध नाही लागला.


तब्बल 8 तास सर्च ऑपरेशन करुनही बुडून मृत्यू झालेल्या डॉक्टरांचा शोध नाही लागला...

*संपूर्ण बातमी ...पोहण्यासाठी गेलेल्या डॉक्टरचा पाण्यात बुडून मृत्यू*

*https://bit.ly/3UlaV7W*

माजलगाव येथील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या डॉक्टरचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी आठ वा दरम्यान घडली होती.या

सदरील घटनेची माहिती मिळताच बीड व परळी येथील आपत्कालीन पथकातील कर्मचारी व सर्व टीमने तब्बल आठ तास लागतात तळ्यात मृतदेहाचा शोध घेतला परंतु रात्री अंधार खूप झाल्याने हे ऑपरेशन थांबवावे लागले.


 रात्री उशिरापर्यंत ही पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या डॉक्टरांचा शोध न लागल्यामुळे उद्या सकाळपर्यंत वाट पाहून परत उद्या सर्च ऑपरेशन करावे लागेल असे परळी येथील पथक प्रमुख  अग्निशमन अधिकारी दिनेश पवार महेश अनकाडे फायरमन केशव राठोड अभय चव्हाण ज्ञानेश्वर गीते वाहन चालक सूर्यकांत दत्तू मस्के व ग्रामस्थ संतोष चव्हाण व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी बोलताना व्यक्त केले.


डॉ.दत्ता फपाळ वय 40 वर्ष रा. बेलुरा ता.माजलगांव मयत डॉक्टरचे नाव आहे. ते सकाळी मित्रांसमवेत माजलगाव येथील  असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेले होते. दरम्यान तळ्यातील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी माजलगाव तहसीलदार वर्षा मनाळेसह माजलगाव पोलीस दाखल झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या