Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

फाईव्ह स्टार |'या' पुरस्काराचे खरे श्रेय हे|पंकजाताई मुंडें यांचेच |ग्रामस्थांनी मानले आभार




पोहनेर जिल्हा परिषद शाळेला केंद्र शासनाचा जिल्हास्तरीय 'स्वच्छ विद्यालय', जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले पुरस्काराचे वितरण

परळी येथे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे ग्रामविकास मंत्री असतांना तालुक्यातील पोहनेर येथील जिल्हा परिषद शाळेला नवीन सुसज्ज व भव्य इमारत मिळाली होती,आता याच शाळेचा गौरव केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने    'स्वच्छ विद्यालय' पुरस्कार देऊन केला आहे. या पुरस्काराने पोहनेरची मान जिल्हयात उंचावली असून ग्रामस्थांनी याचे सर्व श्रेय पंकजाताईंना देत त्यांचे आभार मानले आहेत.


पंकजाताई मुंडे यांनी मागील सत्तेच्या काळात ग्रामविकास मंत्री असतांना पोहनेर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला मोठ्या प्रमाणात निधी दिल्याने शाळेला भव्य आणि सुसज्ज इमारत मिळाली होती, परिसरातील विद्यार्थ्यांची त्यामुळे चांगली सोय होऊ शकली, परिणामी विद्यार्थ्यांची पटसंख्या देखील वाढली. पंकजाताईंच्या सूचनेनुसार खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी हे गाव सांसद आदर्श ग्राम योजनेत समाविष्ट केल्याने कोटयवधी रूपयांची विकास कामे याठिकाणी झाली. पंकजाताई मुंडेंच्या प्रयत्नाने शाळेला मिळाली होती नवी इमारत ; ग्रामस्थांनी मानले आभार


पंकजाताईंनी दिलेल्या निधीतून उभारलेल्या याच शाळेला आता सन २०२१-२२ चा केंद्र सरकारचा जिल्हास्तरीय 'स्वच्छ विद्यालय' पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वच्छतेचे सर्व निकष पाळत फाईव्ह स्टार रेटींगसह शंभर टक्के स्कोअर या शाळेला मिळाला आहे.बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी आज शाळेचे मुख्याध्यापक महेश राजुरकर व शिक्षकांचे अभिनंदन करून या पुरस्काराचे वितरण केले. 

ग्रामस्थांनी दिले पंकजाताईंना श्रेय

दरम्यान, ग्रामस्थांनी पंकजाताईंना फोन करून शाळेला पुरस्कार मिळाल्याचे सांगितले. या शाळेचे बांधकाम आपल्याच प्रयत्नातून भव्य दिव्य करण्यात आले आणि त्याचमुळे आज आपल्या या शाळेला पुरस्कार मिळालेला आहे या पुरस्काराचे खरे श्रेय हे आपलेच आहे आम्हा सर्व पोहनेरकरांसाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे सर्व गावकऱ्यांच्या वतीने आपले मनःपूर्वक धन्यवाद व आभार असे ग्रामस्थांनी म्हटले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या