थर्मल कॉलनीत श्रीगणेशाची आरती |मुख्यअभियंता आव्हाड यांच्या हस्ते संपन्न
परळी थर्मल कॉलनी येथे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती दि 3 सप्टेबर रोजी संपन्न झाली,या प्रसंगी अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
यावर्षी सर्वत्रच गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून, याच निमित्य महादेव शिव शंकर यांचं गौरी सजावट हे प्रमुख आकर्षण झाले आहे याचे कौतुक सर्वत्र होत आहे.
टी पी एस कॉलनी गणेश मंडळ , नवीन कलब बिल्डिंग ,परळी या ठिकाणी श्रीगणेशाची आरती संपन्न झाली,यावेळी मुख्य अभियंता मोहन आव्हाड सपत्नीक आरती साठी उपस्थित होते या वेळी उपमुख्य अभियंता दिनकर इंगळे, उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार, प्रभारी आधिक्षक अभियंता श्रीधर नागरगोजे, सुरेश गर्जे, बिंगोले, मोराळे, सी एम मुंडे ,कल्याण अधिकारी दिलीप वंजारी,मनोज जाधव , राजेभाऊ घुले, अतुल नागरगोजे, सोपान चोधर, मुज्जू भाई, जावळे,टी पी एस कॉलनी गणेश मंडळ सर्व पद अधिकारी सह आदींची उपस्थिती होती.






Social Plugin