Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत साकारलाय हुबेहूब| वैष्णोवीदेवि माता दर्शनाचा देखावा |धनंजय मुंडेंच्या हस्ते उद्घाटन

 




#Parli_परळीत साकारलाय हुबेहूब|
वैष्णोवीदेवि माता दर्शनाचा देखावा |धनंजय मुंडेंच्या हस्ते उद्घाटन


परळी येथे घटस्थापना करून आजपासून सर्वत्र शारदीय नवरात्री उत्सवास प्रारंभ झाला आहे. परळीत यानिमित्त जम्मू-काश्मीर मधील माता वैष्णोवी देवी मंदिराचा हुबेहूब देखावा येथील राधा-मोहन साथी प्रतिष्ठान व आ.धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान मार्फत साकारण्यात आलाय. या देखाव्याचे आज सायंकाळी धनंजय मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 


या ठिकाणी वेगवेगळ्या उंचीवर बांबू व अन्य साहित्याच्या मदतीने हुबेहूब वैष्णो माता मंदिर व परिसराचा जिवंत देखावा साकारण्यात आला आहे. या ठिकाणची पाहणी करून धनंजय मुंडे यांनी आरती करत दर्शन घेतले तसेच सुरक्षेच्या दृष्टीने आयोजकांना काही उपाययोजना देखील सुचवल्या. 


याप्रसंगी राधा मोहन साथी प्रतिष्ठानचे चंदुलाल बियाणी, दीपकनाना देशमुख, संजय फड यांच्यासह पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#Parli

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या