Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

वाहुन गेलेल्या 3 वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडला..


वाहुन गेलेल्या 
3 वर्षाच्या मुलाचा तब्बल दोन दिवसांनी मृतदेह सापडला..

बीड सध्या सर्वत्र पाऊस  असल्याने नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत त्यामुळे अशा घटना घडू नये यासाठी मुलांची काळजी घेणे गरजेचे झाले आहे. कारण नुकतीच बीड जिल्ह्यातील जिल्ह्यातील गेवराई येथील तीन वर्षीय मुलगा पाय घसरुन वाहुन गेल्याची घटना घडली आहे त्यामुळे गेवराई शहरात खळबळ उडाली आहे.


मिळालेली प्राथमिक माहिती अशी की दि 26 रोजी दु 1 वा दरम्यान  शहरातील चिंतेश्वर गल्ली येथे राहणारे ज्ञानेश्वर क्षीरसागर यांचा 3 वर्षाचा बन्टी नावचा मुलगा शाळेतुन घरी आल्यानंतर घराकडे येत आसतांना रोडवर चिखलात पाय घसरुन नालीत पडला तोच वाहुन गेला...


शहरात सकाळ पासुन जोरदार पाऊस कोसळत होता. त्यामुळे ओढे नदी नाले तुडुंब  भरून  वाहत आहेत. त्यामुळे मुलाचा शोध घेणे सुरु होते. शोध मोहिम सुरु होती परंतु तब्बल दोन दिवसांनी शोध लागला. घटना स्थळी तहसिलदार सचिन खाडे व प्रशाकीय अधीकारी उपस्थित  आहेत. नुकताच माजलगाव येथील धरणात बुडालेल्या डॉक्टरांच्या दुर्दैवी घटनेनंतर पुन्हा एकदा ही अशी दुर्दैवी घटना म्हणजे काळजीचा विषय आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या