Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न साकार झाले | अहमदनगर डेमू रेल्वे सेवेला हिरवा झेंडा ..

 स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न साकार झाले





न्यू आष्टी ते अहमदनगर डेमू रेल्वे सेवेला हिरवा झेंडा |झाला शुभारंभ 

रविवार वगळता रेल्वे दररोज धावणार हे आहे वेळापञक

बीड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल,पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,रेल्वे,कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दादाराव पाटील दानवे अन्य मान्यवरांचे यावेळी भाषणही झाले स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या आठवणीने प्रत्येक भाषणांचा शेवट हे याचे आकर्षण  ठरले 

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मध्य रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे,खासदार डॉ.प्रीतम मुंडे,आ.सुजय विखे पाटील,महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंत्री पंकजा मुंडे,आ.सुरेश धस,भीमराव धोंडे, शिवाजी कर्डिले,आ.बाळासाहेब आजबे,आ.नमिता मुंदडा, आ.लक्ष्मण पवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते व अन्य मान्यवरांच्या प्रत्यक्ष प्रमुख उपस्थितीत आज सकाळी नवीन आष्टी - अहमदनगर नवीन लाईनचे उद्घाटन झाले आहे.

नवीन आष्टी- अहमदनगर डेमू सेवेचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात येणार आला. या पार्श्वभूमीवर 

नवीन आष्टी -अहमदनगर नवीन लाईनची पार्श्वभूमी आणि फायदे 


66 किमी नवीन आष्टी-अहमदनगर ब्रॉडगेज लाईन 261 किमी अहमदनगर ,बीड ,परळी वैजनाथ नवीन ब्रॉडगेज लाईन प्रकल्पाचा एक भाग आहे.


ज्यामध्ये भारत सरकार आणि राज्य सरकार यांच्यात 50-50 खर्चाचा वाटा आहे.


 • डेमू (DEMU) सेवा नवीन आष्टी - अहमदनगर पट्ट्यातील रहिवाशांना आणि जवळपासच्या भागातील रहिवाशांना उत्तम कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करेल.

 • यामुळे स्थानिक व्यापार आणि उद्योगांना चालना मिळेल आणि त्यामुळे मराठवाडा क्षेत्राच्या सामाजिक - आर्थिक विकासाला चालना मिळेल.


 • डेमू ट्रेन अहमदनगरहून सकाळी 07.45 वाजता सुटेल आणि न्यू आष्टीला सकाळी 10.30 वाजता पोहोचेल आणि परतीच्या प्रवासात न्यू आष्टी येथून सकाळी 11.00 वाजता सुटेल आणि दुपारी 1.55 वाजता अहमदनगर येथे पोहोचेल. ही गाडी रविवार वगळता दररोज धावणार आहे.


 • कडा, नवीन धानोरा, सोलापूरवाडी, नवीन लोणी आणि नारायणडोहो येथे थांबेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या