Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

PARLI |ऑपरेशनची गरज |परळीचे उपजिल्हा रुग्णालयाला | समस्यांनी ग्रासले...

*हेही वाचा  न्यूज|गौरी-गणपती स्पर्धा महोत्सवाचे पारितोषिक वितरण या दिवशी होणार...* 👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com/2022/09/blog-post_0.html*



ऑपरेशन|परळीचे उपजिल्हा रुग्णालय |समस्यांनी ग्रासले...

पंकजाताई मुंडे यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गुट्टे यांना दिल्या सूचना 

परळी उपजिल्हा रुग्णालयातील ऑपरेशन थेटरचे नुतनीकरणाचे काम बंद असल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना छोट्या मोठ्या शस्त्रक्रियेसाठी खाजगी किंवा आंबेजोगाई येथे जावे लागत आहे. ऑपरेशन थेटरचे काम बंद असल्याचे निदर्शनास आणून देताच पंकजाताई मुंडे यांनी ऑपरेशन थेटरचे काम त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या आहेत.


परळी शहरात100 खाटाची क्षमता असलेले उपजिल्हा रुग्णालय म्हणून प्रसिद्ध आहे या रुग्णालयात शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक रुग्ण उपचारासाठी येत असतात. हा दवाखाना नुसता नावालाच का असाही प्रश्न अनेक रुग्णांना पडला असून इथे असलेले यंत्रसामग्री लोक उपयोगी नसून..डेमू थेरपीच्या कामाला येते की काय असेही चर्चा नागरिक करत आहेत.उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. मागील 2 महिन्यापासून ऑपरेशन थेटरचे नुतनीकरनाचे काम सुरू होते.परंतु हे काम सध्या बंद असल्याने छोट्या मोठ्या शस्त्रक्रियेसाठी खाजगी रुग्णालयात किंवा अंबेजोगाई सरकारी दवाखान्यात जावे लागत आहे. 


यामुळे गोरगरीब रुग्णांना आर्थिक भार पडत आहे.ऑपरेशन थेटरचे काम त्वरित पूर्ण करून घ्यावे यासाठी आज शनिवार दि 24 सप्टेंबर रोजी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अरुण गुट्टे यांना निवेदन दिले. 


भाजयुमो तर्फे रक्तदान शिबिराच्या उद्घाटनासाठी भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा. प्रीतमताई मुंडे उपजिल्हा रुग्णालयात आल्या असता अश्विन मोगरकर यांनी ऑपरेशन थेटरचे काम बंद असल्याचे निदर्शनास आणून दिले.पंकजाताई मुंडे यांनी त्वरित काम पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या.यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष निळकंठ चाटे,भाजपाचे अश्विन मोगरकर,भाजयुमो चे शहर कोषाध्यक्ष प्रीतेश तोतला,सेलू सोसायटी चेअरमन बाळासाहेब फड उपस्थित होते.


*हेही वाचा... PARLI |हेलीकॅप्टर प्रवासाचा आनंद |परळीत पुन्हा एकदा|जॉय राईड 5999 रुपयांत मिळवा* 👇👇👇👇👇👇👇*https://aplaepaper.blogspot.com/2022/09/5999.html*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या