Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीतील 'धनंजय' यांचा शिंदे गटच्या शिवसेनेत जाहिर प्रवेश...

 



परळीतील 'धनंजय' यांचा शिंदे गटच्या शिवसेनेत जाहिर प्रवेश...

परळी तालुक्यातील सामाजीक कार्यकर्ते युवानेते धनंजय गित्ते यांनी शनिवार दि.24 सप्टेंबर रोजी राज्याचे आरोग्य मंत्री ना.तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत  शिंदेगटाच्या शिवसेनेत जाहिर प्रवेश केला आहे.

अबब...परळीत देवीचे चमत्कारीक |एक अद्भुत कालराञी देवीचे हे रुप तुम्ही कधीच पाहिले नसेल... 

👇👇👇👇👇👇👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2022/09/blog-post_61.html*



गित्तेंच्या प्रवेशाने परळीत शिंदेगटाची ताकद वाढली..

युवानेते धनंजय गित्ते यांच्या शिवसेना शिंदेगटातील प्रवेशाने परळी तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढली असुन तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक माणसापर्यंत भविष्यात शिवसेनेचा शिंदे गट परळी तालुक्याच्या राजकिय क्षेत्रात महत्वपुर्ण भुमिका बजावणार आहे.


शिवसेना शिंदेगटाच्या वतीने... 

बीड येथे शनिवार दि.24 सप्टेंबर रोजी हिंदु गर्जना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या मेळाव्यात परळी तालुक्यात साखर कारखान्याच्या माध्यमातुन शेतकरी,ऊसतोड मजुर, कामगारांच्या समस्या धनंजय गित्ते यांनी उपस्थिती लावत आरोग्य मंत्री ना.तानाजी सावंत,आ.ज्ञानराज चौगुले,माजी मंत्री सुरेशराव नवले,जिल्हाप्रमुख सचिन मुळुक,कुंडलिकराव खांडे आदींच्या उपस्थितीत शिवसेनेचे शिवबंधन बांधले.



यावेळी तालुकाप्रमुख शिवाजीराव शिंदे,जिल्हा उपाध्यक्ष ॲड.रामराव माने,विश्वनाथ धोंडिराम राठोड तालुका सचिव,यशोदा लहूदास राठोड महिला आघाडी तालुका प्रमुख,गजानन कोकीळ युवासेना शहर प्रमुख,सुंदर उत्तमराव रवळे उप तालुकाप्रमुख सिरसाळा गट,संपत मधुकर शिंदे विभाग प्रमुख सिरसाळा,दत्ता सुखदेव सोनवणे सर्कल प्रमुख सिरसाळ गण,तुकाराम कोंडीबा काळे सर्कल प्रमुख पिंपरी,विष्णू कारभारी ढेंबरे उप शहर प्रमुख सिरसाळा,महादेव त्र्यंबकराव कुकर शहर संघटक सिरसाळा,कविता उत्तम राठोड लहूदास राठोड,विकास गायकवाड,सचिन ढाकणे आदींची उपस्थिती होती.

*हेही वाचा Accident |अपघात |बीड जिल्ह्यातील दोघांचा जागीच मृत्यू* 👇👇👇👇👇👇👇 *https://aplaepaper.blogspot.com/2022/09/blog-post_54.html*


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या