परळी जवळ अनोळखी मृतदेह आढळला...ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने आवाहन
परळी जवळ टोकवाडी येथे राज्य रस्त्यावर एका 40 वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. या मृतदेहाची ओळख पटविण्याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, दि. 23 रोजी 11 वाजण्याच्या सुमारास टोकवाडी जवळ राज्य रस्त्यावर अंदाजे 40 वर्षिय वयाच्या एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे.
उंची अंदाजे 5 फूट,सडपातळ, अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची पॅण्ट अशा वर्णनाचा पुरुष मृतदेह आढळून आला आहे. या अनोळखी मयताची ओळख पटविण्यासाठी परळीच्या पोलीस ठाण्याची संपर्क साधावा असे आवाहन तपासी अधिकारी सहा.पो.नि.डॉ.व्ही. व्ही.शहाणे यांनी केले आहे.
*Accident |अपघात |बीड जिल्ह्यातील दोघांचा जागीच मृत्यू* 👇👇👇👇👇👇👇 *https://aplaepaper.blogspot.com/2022/09/blog-post_54.html*



Social Plugin