Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

#accident |ऊसतोड मजूरांचा ट्रॅक्टर उलटल्याने एका अकरा वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू |



#accident |ऊसतोड मजूरांचा ट्रॅक्टर उलटल्याने एका अकरा वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू |


अंबाजोगाई जवळच 10 किलोमीटर अंतरावर येल्डा ते मुकुंदराज घाटात ऊसतोड मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटल्याने एका अकरा वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 12 जण जखमी झाले आहेत. 


या अपघातामध्ये दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्या जखमींवर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.शुक्रवारी पहाटे हा अपघात झाला. रणजित अमोल कांबळे वय 11असे मृत मुलाचे नाव आहे.


अंबाजोगाई येल्डा येथील ऊसतोडणी कामगार शुक्रवारी पहाटे ट्रॅक्टरमधून साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जात असताना मुकुंदराज घाटाजवळ सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टरचा रॉड तुटल्याने ट्रॉली पलटी झाली. 


या अपघातात एका मुलाचा जागीच मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. तर 10 जण जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


घटनास्थळी अनेक सामाजिक कार्यकर्ते यांनी सहकार्य केल्यामुळे जखमींना तत्काळ मदत मिळाली.स्वामी रामानंद तीर्थचे डॉ. दाखल झाले आहेत.अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर, तहसीलदार विपीन पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या