Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

धक्कादायक |86 राजकीय पक्ष व चिन्ह |निवडणूक आयोगाने केली बाद



निवडणूक आयोगाने यामुळे 86 राजकीय पक्ष व चिन्ह यादीतून केली बाद 

महाराष्ट्रसह 6 राज्यातील 253 पक्षांवर आज कारवाई 86 छोट्या पक्षांची नावेही राजकीय पक्षांच्या यादीतून बाद...

मुंबई निवडणूक लढविण्यास आयोगाकडून परवानगी मिळाल्यानंतर निवडणूक चिन्हांबाबतचे नियम पाळणे बंधनकारक आहे.देशातील अनेक राज्यांतील छोट्या पक्षांनी त्याचे पालन केले नाही,या 253 पक्षांवर आज कारवाई करण्यात आली आहे. 


या सर्व राजकीय पक्षांनी गेल्या अनेक निवडणुका लढवल्या नव्हत्या.या पक्षांनी निवडणुकीसाठी उमेदवारही दिला नव्हता,त्यामुळे निवडणूक आयोगाने या पक्षांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.


निवडणूक आयोगाने नियमांचे पालन न करणाऱ्या या पक्षांना निष्क्रिय केले असून त्यात राज्यातील निवडणूक लढविणाऱ्या पक्षांचाही समावेश आहे. 


बिहार उत्तरप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र,तामिळनाडू,तेलंगणा आणि दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे हे पक्ष निष्क्रिय करण्यात आले आहेत


यासोबतच निवडणूक आयोगाने 86 छोट्या पक्षांची नावेही राजकीय पक्षांच्या यादीतून काढून टाकली आहेत.भारत निवडणूक आयोग अनेक दिवसांपासून या राजकीय पक्षांची माहिती गोळा करत होता. निवडणूक आयोगाकडून या राजकीय पक्षाला चिन्हे मिळाल्यानंतरही ते सक्रिय असल्याचे दिसून आले नाही.

 त्यामुळे निवडणूक आयोगाने महाराष्ट्र,कर्नाटक,बिहार,उत्तर प्रदेश, तामिळनाडू,तेलंगणा आणि दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना सविस्तर अहवाल तयार करण्यास सांगितले. निवडणूक आयोगाने या 253 पक्षांना नोटीस पाठवली, मात्र या पक्षांनी निवडणूक आयोगाच्या नोटीसला उत्तर दिले नाही. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या