Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत सेल्फी पॉईंट..व धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्याच्या इतिहासात |रोवला एक मानाचा तुरा

 


या वेळी या सोहोळ्यात  परळी नगरीचे माझी नगराध्यक्ष आदरणीय बाजीराव धर्माधिकारी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर मनोगत व्यक्त करण्यात आले तो क्षण....




परळीत सेल्फी पॉईंट..व धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्याच्या इतिहासात |रोवला एक मानाचा तुरा 


धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळीत साकारलेले देशभक्तीचे प्रेरणास्थान 150 फूट उंच तिरंगा ध्वजाचे उद्घाटन शनिवारी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते व डॉ. प्रीतम मुंडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत झाले  परळी माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळी नगर परिषदेच्या माध्यमातून परळी शहरातील वैद्यनाथ महाविद्यालयाच्या टेकडीवर भव्य तिरंगा ध्वज उभारण्यात आला 



    भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शनिवारी लोकापर्ण संपन्न झाले. 150 फूट उंचीचा भव्य तिरंगा ध्वज उभारण्यात आला असून, एलईडी स्पॉट लाईट, जनरेटर, सीसीटीव्ही, सेफ्टी वॉल कंपाऊंडसह.. 


    परळीत सेल्फी पॉइंट उभारण्यात आला आहे. या विशाल तिरंगा ध्वजाचे लोकार्पण माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते शनिवार, दि.13 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 वाजता झाले आहे. बीड जिल्ह्याचे खासदार डॉ. प्रितमताई मुंडे, बीड जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, तहसीलदार सुरेश शेजूळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 


    मराठवाड्यातील सर्वात उंच असलेला हा विशाल तिरंगा ध्वज सुमारे 82 लाख रुपये खर्चून उभारण्यात आला आहे. वैद्यनाथ महाविद्यालया मागील उंच टेकडीवर तिरंगा ध्वज फडकवल्यानंतर हा ध्वज दूरवरून लक्ष वेधून घेत  आहे. या ध्वजासह सेल्फी पॉईंटचे उद्घाटन शनिवार दि.13 रोजी सकाळी 10.30 वाजता मान्यवरांच्या हस्ते झाले  असून या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर व देशभक्तांनी उपस्थित होते 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या