दोन महिन्यापूर्वीच लातूरमध्ये विद्यार्थ्यांजवळ गुंगीच्या गोळ्या | तब्बल 350 गोळ्या जप्त
लातूर येथे गुंगीच्या गोळ्या विकणाऱ्या एका तरुणास पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी छापा टाकून त्याच्याजवळ असलेल्या तब्बल 350 गोळ्या ताब्यात घेतल्या होते आज या स्टिंग ऑपरेशनचे थेट कनेक्शन बीड जिल्ह्यामध्ये आढळून आल्यामुळे लातूर जिल्हा बीड जिल्हा आदी भागात हि रॅकेट सरास गुंगीच्या गोळ्यांचे औषध विक्री करत असल्याचे समोर आले आहेत याबाबत अजूनही तपास सुरू असून दोन महिन्यापूर्वी घडलेल्या बातमीचा सविस्तर वृत्तांत बघू..
या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूर शहरात गुंगीच्या गोळ्यांची विक्री सर्रास होत असल्याचे दिसून येत आहे. एसएससी बोर्डाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक युवक गुंगीच्या गोळ्या विकत असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण मोहनराव राठोड यांना मिळाली.
अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील अधिकारी व पंचांसह घटनास्थळी धाव घेतली. सुमित संतोष कासले वय 22. विवेकानंद चौक लातूर, टी. चाकूर सध्या डपका येथे राहतो, तो गुंगीच्या गोळ्या विकण्यासाठी बसला होता. त्याच्या ताब्यातून दोन बॉक्समध्ये नाईटमोर 10mg च्या 350 गोळ्या जप्त करण्यात आल्या. या गोळ्या जप्त करण्यात आल्या असून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
Social Plugin