Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

वैद्यनाथ महाविद्यालय मध्ये हर घर तिरंगा अभियानात भित्तिपत्रकाचे प्रकाशन

 

वैद्यनाथ महाविद्यालय मध्ये हर घर तिरंगा अभियानात भित्तिपत्रकाचे प्रकाशन

परळीत वैद्यनाथ महाविद्यालयमध्ये दि १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्याने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत बी.एससी. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे येऊन हर घर तिरंगा या भित्तिपत्रकाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.व्हि. मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले होते.


यामध्ये विद्यार्थ्यांनी तिरंग्याचे महत्त्व, नियम, उचित सन्मान, राष्ट्रध्वज संहिता,राष्ट्रभक्ती,देशप्रेम इत्यादी बाबतचे मार्गदर्शन या अभियानात भित्तिपत्रकाद्वारे करण्यात आले. 


सदरील उपक्रमात बी.एससी. द्वितीय वर्ष रसायनशास्त्राचे रसायनशास्त्राचे विद्यार्थी ज्ञानेश्वर मुंडे, गायत्री सदरे, जयपाल गीते, पायल शिंदे, पूनम केंद्रे, प्रिती आंधळे यांनी सहभाग नोंदवला होता. कार्यक्रमास संयोजक प्रा. डॉ. एम.जी लांडगे, प्रा.एस. व्हि.रेणुकदास, प्रा.डब्ल्यू वडाळ आणि विभागप्रमुख डॉ. बी.व्हि.केंद्रे यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या